घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

कर्वेनगरमध्ये पतीच्या छळामुळे महिलेची आत्महत्या

पतीच्या छळामुळे महिलेने विषारी ओैषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना कर्वेनगर भागात घडली. महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पतीविरुद्ध वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

राणी तिरुपती कुऱ्हाडे (वय २५, रा. स्नेहांकित काॅलनी, कर्वेनगर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत कुऱ्हाडे यांचा भावाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राणी कुऱ्हाडे मूळच्या कर्नाटकातील विजापूरच्या आहेत. २०१८ मध्ये त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर पतीने त्यांचा छळ सुरू केला.

छळामुळे बहिणीने २६ फेब्रुवारी रोजी राहत्या घरात विषारी ओैषध प्राशन करुन आत्महत्या केली, असे राणी कुऱ्हाडे यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक सचिन पाटील तपास करत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें