घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

‘ॲल्ब्युरेल’ बनावट औषध विक्रीचा भंडाफोड; पाच ठोक विक्रेत्यांवर गुन्हा

पुण्यात ॲल्ब्युरेल नावाच्या बनावट औषधाची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी पाच वितरक-पुरवठादारांवर गुन्हा दाखल केला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या तपासात ॲल्ब्युरेल नावाचे बनावट औषध बाजारात विक्री होत असल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी पुणे, मुंबई, नागपूर आणि रायगड येथील पाच ठोक विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या रॅकेटचा भंडाफोड औषध निरीक्षक श्रुतिका जाधव यांच्या फिर्यादीवरून झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्याच्या पुणे विभागात कार्यरत असलेल्या औषध निरीक्षक श्रुतिका जाधव यांनी 28 जुलै 2025 रोजी सदाशिव पेठ येथील मे. मैत्री फार्मास्युटिकल्स येथे तपासणी केली. तेथून ॲल्ब्युरेल व रिच्युएक्सरेल या औषधांचे नमुने घेऊन ते शासकीय विश्लेषक, मुंबई यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले.

शासकीय विश्लेषकांच्या अहवालानुसार ॲल्ब्युरेल हे औषध चाचणीमध्ये अपयशी ठरले असून, ते औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 च्या कलम 17 (ब) अन्वये बनावट घोषित करण्यात आले आहे. तपासादरम्यान या बनावट औषधाची खरेदी-विक्री साखळीत मे. मैत्री फार्मास्युटिकल्स (सदाशिव पेठ, पुणे), मे. श्री साई लॉजिस्टिक (नागपूर), एम/एस नेक्सस लाईफकेअर प्रा. लि. (दादर (पूर्व), मुंबई), एन आर एक्स डिस्ट्रिब्युटर्स एलएलपी ( सायन, मुंबई), एम/एस आरआरटी फार्मा (कामोठे, रायगड) या सर्वांनी संगनमत करून बनावट औषधांची खरेदी-विक्री केल्याचा आरोप आहे. बनावट औषधावर उत्पादक म्हणून नमूद असलेल्या रिलायन्स लाईफ सायन्स प्रा. लि. (नाशिक) यांनी लेखी पत्राद्वारे संबंधित बॅचचे उत्पादन त्यांनी केले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें