पुण्यात मार्चची सुरुवात होताच उन्हाने आपला रंग दाखवायला सुरुवात केली आहे. आज शहरात सकाळपासूनच ऊन कडक आहे आणि दुपारी तर अजूनच उकाडा जाणवणार आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या अंदाजानुसार आज पुण्याचे कमाल तापमान 33 अंशांपर्यंत जाऊ शकते, तर किमान तापमान 19 अंशांपर्यंत राहील. सकाळीच तापमान 21 अंश होते आणि हवेत ओलावा जास्त होता.
दुपारच्या वेळी ऊन खूप तीव्र असेल. त्यामुळे शक्यतो 11 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळा. बाहेर जावे लागल्यास डोक्यावर टोपी, डोळ्यांना गॉगल आणि सोबत पाण्याची बाटली ठेवा.
उन्हाळ्याच्या दुष्परिणामांपासून कसे वाचाल ?
उन्हाळ्यात उष्माघात, चक्कर येणे, अंगात अशक्तपणा, डोकेदुखी, त्वचेवर जळजळ अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे खालील
काळजी घ्या :
काय करावे ?
दिवसभरात भरपूर पाणी प्या; तहान लागण्याची वाट पाहू नका.
लिंबूपाणी, ताक, नारळपाणी यांसारखे द्रवपदार्थ घ्या.
हलके, सैल आणि सुती कपडे वापरा.
घराबाहेर पडताना टोपी, स्कार्फ, छत्री आणि गॉगल वापरा.
शक्यतो दुपारी 11 ते 4 या वेळेत बाहेर जाणे टाळा.
बाहेरून आल्यावर लगेच थंड पाणी पिण्याऐवजी थोडा वेळ थांबा.
काय टाळावे ?
रिकाम्या पोटी उन्हात जाऊ नका.
जास्त वेळ थेट सूर्यप्रकाशात उभे राहू नका.
जड, तेलकट आणि खूप तिखट पदार्थ कमी खा.लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी.आज पावसाची काहीच शक्यता नाही. आकाश दिवसभर निरभ्र राहणार आहे. वारे हलकेच वाहतील, त्यामुळे उकाडा अधिक जाणवू शकतो.
महत्वाचे म्हणजे आज UV इंडेक्स 8 (उच्च) आहे. म्हणजेच सूर्यकिरणांचा परिणाम त्वचेवर जास्त होऊ शकतो. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.
मार्चच्या पहिल्याच आठवड्यात वाढलेले तापमान येत्या कडक उन्हाळ्याची चाहूल देत आहे. पुणेकरांनी आतापासूनच उन्हाळ्याची तयारी सुरू करायला हरकत नाही!











