घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा योजना रखडल्या

महापालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध पाणीपुरवठा योजनांची कामे रखडल्याने नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने रखडलेल्या कामांना गती देण्याचे आश्वासन दिले आहे.

पाणीपुरवठा विभागाच्या माहितीनुसार, सूस, म्हाळुंगे, बावधन बुद्रुक, लोहगाव-वाघोली, केशवनगर आणि शेवाळवाडी येथील योजना मुदत संपूनही अपूर्ण आहेत. तसेच साडेसतरानळी, मांजरी बुद्रुक, ऊरुळी देवाची, फुरसुंगी आणि भिलारवाडी परिसरातील प्रकल्पही रखडले आहेत.

काही ठिकाणी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार असूनही प्रत्यक्ष कामांना सुरुवात झालेली नाही. प्रशासनाच्या मते, जागेच्या उपलब्धतेसंबंधी अडचणी, तांत्रिक बाबी तसेच स्थानिक पातळीवरील प्रश्नांमुळे प्रकल्पांना विलंब झाला.

मात्र, आता या अडचणी सोडवण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू करण्यात येणार आहेत. संबंधित विभागांनी प्रलंबित कामांचा आढावा घेतला असून, प्रत्येक योजनेसाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार केला जात आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें