घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुणे मेट्रोचा महत्त्वाचा निर्णय; तिकीट स्कॅन केल्यावरच उघडणार AFC गेट्स

पुणे शहरातील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणे मेट्रो प्रशासनाने स्थानकांवरील ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन (AFC) गेट्समध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

उद्या ३ मार्चपासून ही नवी प्रणाली लागू होणार आहे.आतापर्यंत मेट्रो स्थानकांवरील AFC गेट्स उघडे असत. प्रवाशांनी तिकीट स्कॅन केल्यानंतर हिरवा दिवा लागत असे आणि त्यानंतर प्रवेश करता येत असे. मात्र तिकीट नसल्यास किंवा चुकीचे तिकीट असल्यास फ्लॅप गेट्स बंद होत असत.

आता नव्या प्रणालीअंतर्गत AFC गेट्स नेहमी बंद स्थितीत राहतील. प्रवाशांनी क्यूआर कोड तिकीट, मेट्रो कार्ड किंवा व्हॉट्सॲप तिकीट स्कॅन केल्यावरच गेट्स उघडतील.

नवी प्रणाली कशी काम करेल?

प्रवेशापूर्वी : AFC गेटचे दरवाजे नेहमी बंद राहतील. तिकीट स्कॅनिंग : क्यूआर कोड, मेट्रो कार्ड किंवा व्हॉट्सॲप तिकीट स्कॅन केल्यानंतरच गेट उघडेल. प्रवेशानंतर : प्रवासी आत गेल्यानंतर दरवाजे आपोआप बंद होतील. विनातिकीट प्रयत्न : तिकीट नसल्यास किंवा चुकीचे तिकीट असल्यास गेट उघडणार नाही.

प्रवाशांची सुरक्षितता, शिस्त आणि विनातिकीट प्रवास रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रवाशांनी स्थानकावर प्रवेश करताना तिकीट किंवा वैध कार्ड जवळ बाळगणे आवश्यक आहे.

धूलीवंदनानिमित्त ३ मार्चला पुणे मेट्रो अर्धा दिवस बंद

धूलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर ३ मार्च २०२६ रोजी पुणे मेट्रो सेवा अर्धा दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. मेट्रो प्रशासनाच्या माहितीनुसार, ३ मार्च रोजी सकाळी ६.०० ते दुपारी ३.०० या वेळेत प्रवासी सेवा पूर्णपणे बंद राहील. दुपारी ३.०० नंतर ते रात्री ११.०० पर्यंत मेट्रो सेवा नियमित वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहे.सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची सुरक्षितता आणि आवश्यक सुरक्षाव्यवस्था लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल मेट्रो प्रशासनाने दिलगीर व्यक्त केली आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें