घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

युध्दग्रस्त देशांमध्ये अडकलेल्या पुणेकरांना माघारी पुण्यात सुखरूप आणण्यासाठी महापालिका उभारणार २४ बाय ७ कक्ष

इराण-इस्रायल युद्धस्थिती बाबत पुणे महापालिकेने गांभीर्याने काम करून युध्द होणाऱ्या देशांमध्ये अडकलेल्या पुणेकरांना माघारी पुण्यात सुखरूप आणण्यासाठी २४ तास कार्यरत असणारा स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे काम तातडीने सुरु केले आहे.

इराण-इस्रायल युद्धस्थितीमध्ये अडकलेले पुणेकर नागरिकांच्या मदतीसाठी ‘विशेष मदत कक्ष’ व ‘डेटा बँक’ कार्यान्वित करण्याबाबत महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका यांस आदेश देण्यात आलेले आहेत. इराण आणि इस्रायलमध्ये सध्या उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे पुणे शहरातील अनेक नागरिक, पर्यटक, विद्यार्थी आणि व्यावसायिक तिथे अडकल्याची दाट शक्यता आहे.

युद्धभूमीवर अडकलेल्या या पुणेकरांच्या सुरक्षेबाबत त्यांच्या पुण्यातील नातेवाईकांमध्ये अत्यंत चिंतेचे वातावरण आहे. या गंभीर परिस्थितीचा आणि आपत्ती व्यवस्थापनाचा विचार करता, पुणे महानगरपालिकेच्या वतीने तातडीने खालील उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे.

१. २४x७ हेल्पलाईन कक्ष: पुणे महानगरपालिकेत एक स्वतंत्र कक्ष स्थापन करून २४ तास कार्यरतअसणारा हेल्पलाईन क्रमांक तातडीने जाहीर करावा.

२. पर्यटक आणि नागरिकांची डेटा बँक युद्धग्रस्त भागात अडकलेल्या पुणेकर पर्यटकांची आणिरहिवाशांची अधिकृत यादी तयार करण्यात यावी.

३. नातेवाईकांकडून खालील माहिती संकलित करावी:* अडकलेल्या व्यक्तीचे/पर्यटकाचे पूर्ण नाव.

* परदेशातील सध्याचा पत्ता/हॉटेलचा पत्ता.* पासपोर्ट क्रमांक (Passport Number).

* तिथे उपलब्ध असलेला स्थानिक संपर्क क्रमांक.

समन्वय व कार्यवाही ही ‘डेटा बँक’ पुढील कार्यवाहीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. सदर माहिती राज्य सरकार, केंद्र सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाला (MEA) तातडीने कळवावी, जेणेकरून तिथे अडकलेल्या पर्यटकांना आणि नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी वेगवान हालचाली करता येतील.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें