इराण–इस्रायल–अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या तीव्र संघर्षामुळे मध्यपूर्वेतील हवाई क्षेत्र काही काळासाठी बंद ठेवण्यात आले. त्याचा थेट परिणाम दुबई आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांवर झाला. अनेक विद्यार्थी, पर्यटक आणि कामानिमित्त गेलेले नागरिक परतीच्या उड्डाणांच्या प्रतीक्षेत अडकून पडले होते.
ही माहिती मिळताच उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी तातडीने परिस्थितीचा आढावा घेतला. संबंधित केंद्रीय आणि स्थानिक यंत्रणांशी संपर्क साधत अडकलेल्या नागरिकांची यादी, त्यांची ठिकाणे आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती गोळा करण्यात आली. विशेषतः विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत त्यांच्या पालकांनाही सतत माहिती देण्यात आली.

या प्रयत्नांचा परिणाम म्हणून स्टार एअरची दोन विशेष विमाने आज फुजैरा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेणार आहेत. वीटी-जीएसओ – दुपारी ३.३० वाजता , वीटी-जीएसएच – दुपारी ४.३० वाजता
या दोन विमानांमधून एकूण १६४ प्रवासी आज संध्याकाळी ५.३० ते ७.०० या वेळेत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होतील. या प्रवाशांमध्ये पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीजचे ८४ विद्यार्थी आहेत. याशिवाय ठाणे, मुरबाड, अहिल्यानगर आणि इतर भागांतील नागरिकांचाही समावेश आहे.
दोन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अडकलेल्या नागरिकांशी दूरध्वनीवरून संवाद साधून त्यांना धीर दिला होता. “तुम्ही सर्व सुरक्षित आहात. काळजी करू नका. महाराष्ट्र शासन आणि मी स्वतः तुमच्या पाठीशी ठाम उभा आहे. तुम्हाला सुखरूप मायदेशी परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.
यानंतर सातत्यपूर्ण पाठपुरावा, विविध शासकीय यंत्रणांशी समन्वय आणि तातडीचे नियोजन यामुळे या १६४ प्रवाशांच्या परतीचा मार्ग मोकळा झाला. संकटाच्या काळात प्रशासनाने दाखवलेली तत्परता आणि समन्वय यामुळे अडकलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.