घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

जयघोषात न्हालेली पाचगणी; श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट यांच्या पालखीचे अभूतपूर्व स्वागत

पाचगणी प्रतिनिधी : प्रमोद रांजणे

पर्यटननगरी पाचगणी मंगलवारी सकाळपासून भक्तिरसात न्हाऊन निघाली. अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट यांच्या श्री स्वामी समर्थ पालखीचे शहरात आगमन होताच “जय जय रघुवीर समर्थ” च्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. ढोल-ताशांचा गडगडाट, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि स्वामीभक्तांच्या अखंड जयघोषात पालखीचे जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आले. एसटी स्टॅण्डसमोरील जॅम शॉपी येथे सकाळी १० वाजता स्वामी पादुकांचा विधिवत अभिषेक करण्यात आला. मंत्रोच्चार, फुलांची उधळण आणि दीपप्रज्वलन यामुळे परिसरात भक्तीची मंगल छटा पसरली. अभिषेकानंतर माने गल्ली, जावळी बँक, गावठाण आणि मुख्य बाजारपेठ मार्गे सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. रस्त्यांच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी फुलांची वर्षाव करत पालखीचे स्वागत केले. महिला भगिनींनी पारंपरिक वेशभूषेत टाळ-चिपळ्या वाजवत भजन केले, तर युवकांनी ढोल-ताशांच्या तालावर वातावरण भारावून टाकले.

शांती कॉटेज येथे स्वामी पादुकांचे दर्शन घेताना भाविकांचा उसळलेला उत्साह

लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटातील भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. क्षणोक्षणी वाढणारी गर्दी पाहता मिरवणुकीला अक्षरशः यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले. बँक ऑफ महाराष्ट्रच्या पाठीमागील शांती कॉटेज येथे पालखीचा विसावा झाला. तेथे पादुकांचे पुन्हा अभिषेक व महाआरती पार पडली. आरतीवेळी भाविकांच्या डोळ्यांत श्रद्धेचे अश्रू दाटून आले होते. “स्वामी समर्थ महाराज की जय” च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. त्यानंतर हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. शहर व परिसरातील असंख्य स्वामीभक्तांनी दिवसभर दर्शनासाठी गर्दी केली. शिस्तबद्ध नियोजन आणि स्वयंसेवकांच्या सहकार्यामुळे सोहळा उत्साहात व शांततेत पार पडला. या भव्य सोहळ्यामुळे पाचगणीची ओळख केवळ पर्यटननगरी म्हणून नव्हे, तर अध्यात्मिक नगरी म्हणूनही अधोरेखित झाली.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें