घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुण्यातील महिलेकडून ४२ लाख रुपये उकळले…

ऑनलाइन मॅट्रिमोनियल साइटच्या माध्यमातून पुण्यातील महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरची तब्बल ४२ लाख ६४ रुपयांनी फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने स्वतःला ISRO मध्ये कार्यरत असल्याचे सांगत महिलेचा विश्वास संपादन केला.नंतर लग्नाचे आमिष देत तिच्याकडून मोठी रक्कम उकळल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 वर्षीय पीडित महिला हिंजवडी येथील एका नामांकित आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करते. तिने नोव्हेंबर २०२४ मध्ये एका मॅट्रिमोनियल वेबसाइटवर प्रोफाइल तयार केली होती. याच दरम्यान तिची ओळख जयेश पाटील नावाच्या व्यक्तीशी झाली. त्याने आपण इस्रोमध्ये काम करत असल्याचे सांगितलं.

तसेच लग्नाची इच्छा व्यक्त केली.पुढे दोघांमध्ये संवाद वाढत गेला. इतकच नाही, तर आरोपीने वाकड येथे येऊन त्या महिलेची भेटही घेतली. आरोपीने हळूहळू महिलेचा विश्वास जिंकला. त्यानंतर भविष्यात मालमत्ता खरेदी करण्याचे कारण देत पैशांची मागणी सुरु केली. तिने त्याच्यावर विश्वास ठेवत पैसेही दिले.

तिने पोलीस तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये एकूण ४२ लाख ६४ लाख रुपये आरोपीच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले.दरम्यान, सातत्याने पैसे मागत असल्याने महिलेच्या मनात संशय आला. तिने आरोपीची चौकशी सुरु केली. त्यावेळी तो इस्रोमध्ये कार्यरत नसल्याची समोर आलं. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तिने पोलिसांत तक्रार दाखल केली.

याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत १६ लाख ६५ हजार रुपये फ्रीज करत परत मिळवले आहेत. उर्वरित २७ लाख रुपये परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचं खरं नाव आदर्श म्हात्रे (रा. अलिबाग, जिल्हा रायगड) येथील रहिवाशी आहे. त्याने यापूर्वी अनेक महिलांची अशाप्रकारे फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. फसवणुकीच्या पैशांतून तो गोवा येथे कॅसिनोमध्ये मौजमजा करायचा अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें