घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

जातीयवादाच्या भस्मासुराच्या होळीत ट्रम्प च्या चित्राचीही पुण्यात होळी

वंदे मातरम् संघटना संयुक्त युवा फिनिक्स सोसायटीच्या विद्यमाने ‘सण करू साजरे – माध्यम जरा वेगळे’ या संकल्पनेतून ‘जातीयवादाच्या भस्मासुराची होळी’ तसेच Epstein Files प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील लैंगिक शोषण, सत्तेचा गैरवापर आणि मानव तस्करीसारख्या अमानवी प्रवृत्तींच्या निषेधार्थ प्रतीकात्मक जेफ्री एप्सटिन, बिल गेट्स, डोनाल्ड ट्रम्प, एलॉन मस्क, बिल क्लिंटन यांचे पोस्टर दहन करून होळी साजरी करण्यात आली.

ही होळी गरवारे शाळेतील मुलींच्या हस्ते पेटवण्यात आली. जिजामाता, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणादायी कार्यभूमीत स्त्रीशक्तीच्या सकारात्मक विचारांनी अन्याय, भेदभाव व शोषणाविरोधात ठाम संदेश देण्यात आला.

या उपक्रमाद्वारे समाजात जात-पात विसरून समानता, महिला सन्मान, बालसुरक्षा आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ करण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी प्रदेश अध्यक्ष सचिन जामगे, शहराध्यक्ष अमोल जगताप, आयटी व माहिती अधिकार अध्यक्ष विशाल शिंदे, आकाश जामगे, राज घाटे, अतिश जाधव, तेजस्विनी शिंदे, निकिता कांबळे, फातिमा शेख व मोठ्या संख्येने संघटनेचे पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते.सदर कार्यक्रम दि. २ मार्च, झाशीची राणी पुतळा, बालगंधर्व चौक, पुणे येथे घेण्यात आला.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें