घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

वर्षभरात ६ हजार ५१० किलो स्फोटके आणि ७६७ इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) जप्त

केंद्रीय राखीव पोलिस दलाने (सीआरपीएफ) गेल्या वर्षभरात दहशतवादी कारवायांचे मनसुबे उधळून लावत मोठी कामगिरी केली आहे. या कालावधीत ६ हजार ५१० किलो स्फोटके आणि ७६७ इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) जप्त करण्यात आले.

या धडक कारवाईमुळे देशावरील संभाव्य मोठे संकट टळले असून, अनेक निष्पाप नागरिकांचे प्राण वाचले, अशी माहिती डीआयजी के.के. पांडे यांनी दिली. विविध राज्यांतील संवेदनशील भागांत राबविण्यात आलेल्या शोधमोहिमांदरम्यान ही कारवाई करण्यात आली.

या यशामागे पुण्यातील इन्स्टिट्यूट ऑफ आयईडी मॅनेजमेंट (आयआयएम) या संस्थेचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ही संस्था सुरक्षा दलांना आयईडी शोधणे आणि निकामी करण्याबाबत अत्याधुनिक प्रशिक्षण देते. २०१२ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने गेल्या १४ वर्षांत आपली क्षमता लक्षणीयरीत्या वाढवली आहे. आतापर्यंत १२ हजार ५५३ हून अधिक अधिकारी व जवानांना येथे प्रशिक्षण देण्यात आले आहे, ज्यात विविध राज्यांचे पोलिस दल, केंद्रीय सशस्त्र पोलिस दले आणि मित्र राष्ट्रांतील प्रतिनिधींचा समावेश आहे.

संस्थेचे महासंचालक व प्राचार्य के. के. पांडे यांनी सांगितले की, प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध असले तरी प्रत्यक्ष कारवाईत मानवी निरीक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरते. उपकरणे आणि प्रशिक्षित जवानांच्या समन्वयामुळे आयईडी शोधण्याची व निकामी करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे, परिणामी घातपाताच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आयआयएमला सीआरपीएफची ‘सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण संस्था’ म्हणून गौरविण्यात आले.

भविष्यात ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला चालना देत डीआरडीओच्या सहकार्याने स्वदेशी उपकरणांच्या निर्मितीसाठी संशोधन सुरू असल्याची माहितीही पांडे यांनी दिली. तसेच, प्रशिक्षण प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढविण्यावर भर दिला जाणार असून, प्रतिकूल हवामानातही आभासी माध्यमातून सराव सुरू ठेवण्याची योजना आहे. सामान्य नागरिकांसाठीही आयईडीविषयक जागरूकता साहित्य लवकरच ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें