घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

दुबईत अडकलेल्या पर्यटकांची मागणी, सरकारकडून केवळ चौकशीचे फोन!

‘आम्हाला सरकारकडून केवळ चौकशीचे फोन येत आहेत; प्रत्यक्ष मदत काहीच नाही. पैसे संपत आले आहेत, विमान कंपन्या काही सांगायला तयार नाहीत, हॉटेलचा खर्च वाढत आहे. आम्हाला सांत्वन नको, इथून बाहेर काढण्यासाठी ठोस मदत हवी आहे,” अशा शब्दांत दुबईत अडकलेल्या भारतीय नागरिकांनी व्यथा मांडली.

ठाण्यातील अनिल साळुंखे आणि त्यांच्यासोबतचा सहा जणांचा गट २४ फेब्रुवारीला दुबईला गेला होता. ३ मार्चला त्यांचे परतीचे विमान होते; मात्र ऐनवेळी उड्डाण रद्द झाल्याने हे सर्व प्रवासी तिथेच अडकून पडले आहेत. विमानतळावर तासनतास रांगेत उभे राहूनही कोणतीही स्पष्ट माहिती मिळत नसल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

साळुंखे यांनी सांगितले की, ”आमचे उड्डाण रद्द झाल्याचा ई-मेल आम्हाला ऐनवेळी आला. एका ट्रॅव्हल पोर्टलवरून बुकिंग केले होते; मात्र त्यांच्या कस्टमर केअरकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. एअरलाईन्सच्या कार्यालयात जाऊन दोन-दोन तास रांगेत उभे राहावे लागत आहे, तरीही ‘आम्हाला काही माहीत नाही’ असे उत्तर दिले जात आहे. विमान कंपन्या तिकीट रि-शेड्युल करत आहेत, पण पुन्हा ते उड्डाणही रद्द होत असल्याने नक्की घरी कधी पोहोचणार, याची कोणतीही स्पष्टता नाही.

”पुण्यातील सरस्वती पाटील म्हणाल्या, ”हॉटेलचे बुकिंग संपले असून, पुढील मुक्कामासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करावे लागत आहेत. अनेकांकडील परकीय चलन संपत आले आहे. अबू धाबीच्या राजांनी तिथे अडकलेल्या प्रवाशांसाठी मोफत निवास आणि भोजनाची व्यवस्था जाहीर केली आहे, मात्र दुबईत अशी कोणतीही सुविधा दिलेली नाही. आम्ही एकूण दहा महिलांचा गट असून त्यात जास्तीत जास्त वयस्कर महिला आहेत.त्यामुळे सरकारने आम्हाला परत आणण्याची व्यवस्था करावी.”

तर संकेत फडतरे म्हणाले, ”येथील भारतीय दूतावासाने किंवा परराष्ट्र मंत्रालयाने केवळ नावांची नोंदणी केली आहे, पण प्रत्यक्षात राहण्याची किंवा खाण्याची कोणतीही सोय केलेली नाही. केवळ फोन करून चौकशी करण्यापेक्षा सरकारने आम्हाला सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी विशेष विमानांची सोय करावी किंवा तोपर्यंत तिथे राहण्या-खाण्याचा खर्च उचलावा.” सध्या हे सर्व नागरिक अनिश्चिततेच्या छायेत असून, युद्धजन्य परिस्थिती निवळून कधी एकदा घर गाठतो, याकडे त्यांचे डोळे लागले आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें