घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पूनावाला स्टड फार्ममध्ये चंदन चोरी; रखवालदाराला मारहाण करुन झाडे कापून नेली

पूनावाला स्टड फार्ममध्ये शिरलेल्या चाेरट्यांनी रखवालदारांना मारहाण करुन चंदनाची चार झाडे कापून नेल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी चंदन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

याबाबत परमेश्वर हिरामण कोळी (वय ४०, रा. जिल्हा परिषद शाळेजवळ, लोणी काळभोर, पुणे-सोलापूर रस्ता) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर रस्त्यावर थेऊर परिसरात पूनावाला स्टड फार्म आहे. चार दिवसांपूर्वी मध्यरात्री चार चोरटे पूनावाला स्टड फार्मच्या भिंतीवरुन उड्या मारुन शिरले. स्टड फार्ममधील रखवालदार कुंदन शर्मा, सरजित सिंग, इंद्रजित गुप्ता यांना मारहाण केली. त्यांना शास्त्राचा धाक दाखवून चोरट्यांनी चंदनाची चार झाडे कापून नेली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या चंदन चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के तपास करत आहेत.शहर परिसरात वर्षभरापासून चंदन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरट्यांनी बंगले, सोसायटी, तसेच शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्थांच्या आवारात शिरून चंदनाची झाडे कापून नेल्याच्या घटना घडल्या आहेत.

विधी महाविद्यालय रस्त्यावर चंदन चोरट्यांनी मध्यरात्री गस्त घालणाऱ्या चांदन चोरट्यांवर हल्ला केल्याची घटना गेल्या वर्षी घडली होती. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात चंदन चोरटा जखमी झाला होता. या प्रकरणात चंदन चोरट्यांना डेक्कन पाेलिसांनी अटक केली होती. डेक्कन जिमखाना भागात बंगल्यात शिरुन चोरट्यांनी चंदनाची झाडे कापून नेली होती.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें