घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

मोटारीतून गावठी दारुची वाहतूक करणारे अटकेत

मोटारीतून गावठी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना वानवडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून गावठी दारू असलेले प्लास्टिक कॅन जप्त करण्यात आले आहे.

लियाकत रोहित अब्बासी (वय ३२, रा. ढोबरवाडी , सोपानबाग, घोरपडी), समीर संजय राठोड (वय २३, रा. शिंदवणे काळेशिवार, ता. हवेली ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. वानवडी पोलीस ठाण्याचे पथक होळीच्या पार्श्वभूमीवर गस्त घालत होते. त्या वेळी अब्बासी आणि राठोड हे मोटारीतून गावठी दारू वाहतूक करत असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस हवालदार दया शेगर आणि अभिजित चव्हाण यांना मिळाली.

पोलिसांनी सापळा लावून मोटार अडवली. मोटारीतून १२ प्लास्टिक कॅन जप्त करण्यात आले.कॅनमध्ये ४२०लिटर गावठी दारू होती. होळी, धुळवडीला दारूला मागणी वाढत असल्याने आरोपी अब्बासीने एकाच्या सांगण्यावरून समीर राठोड याच्याकडून दारू खरेदी केल्याची माहिती चौकशीत दिली.

वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील पोलीस निरीक्षक संगीता जाधव, सहायक निरीक्षक उमाकांत महाडिक, उपनिरीक्षक अल्फाज शेख, महेश गाडवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, आशिष कांबळे, अमोल गायकवाड, गोपाळ मदने, विष्णू सुतार, अभिजित चव्हाण, बालाजी वाघमारे, विठ्ठल चोरमले, अर्शद सय्यद यांनी ही कामगिरी केली.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें