घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

रेल्वेत प्रवाशांचे पाकीट चोरणे पडले महागात

रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांचे पाकीट चोरणाऱ्या मलंग अर्जुन वादवाणी (३४) यास न्यायालयाने तीन महिन्यांचा साधा कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. लोहमार्ग न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. जे. चव्हाण यांनी हा निकाल दिला.

दंडाची रक्कम न भरल्यास दहा दिवसांचा साधा कारावास भोगावा लागेल, असेही निकालात नमूद करण्यात आले आहे.

२४ जुलै २०२२ रोजी फिर्यादी दीपक गायकवाड हे पुणे ते लोणावळा लोकलने देहूरोड ते मळवली असा प्रवास करीत होते. गाडी तळेगाव स्थानक येथे आल्यानंतर वादवाणी व त्याच्या साथीदारांनी संगनमत करून फिर्यादी यांच्या खिशातील पाकीट चोरून करून पळून जात होते.

यावेळी, त्याठिकाणी असलेल्या दामिनी पथकातील पोलिस अंमलदारांनी त्याला पकडले. याप्रकरणी, त्यास अटक करून परिस्थितीजन्य आणि तांत्रिक पुराव्यांसह न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे ॲड. अश्विनी काळे आणि ॲड. पल्लवी काशीद यांनी बाजू मांडली.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें