घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

खाजगी कर्जाचा वाद विकोपाला! डोळ्यांत मिरची पावडर टाकून बेदम मारहाण

कर्जाच्या हप्त्यावरून झालेल्या वादातून तिघांनी एका व्यक्तीसह त्याच्या नातेवाईकाला मारहाण करून मिरची पावडर टाकल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजताच्‍या सुमारास सावता माळी मंदिराच्‍या जवळ, च-होली परिसरात घडली.

बाबूराव निवृत्ती नरदुंडे, पूजा (पूर्ण नाव माहिती नाही) आणि सुनीता गवांडे अशी गुन्‍हा दाखल णलेल्‍या आरोपींची नावे आहेत.अभिजीत अशोक भालेराव (वय 35, रा. सावता माळी मंदिराजवळ, चिखली बुद्रुक, ता. हवेली, जि. पुणे) असे जखमीचे नाव असून त्‍यांनी मंगळवारी (दि. ३) दिघी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिजीत भालेराव हे चालक आहेत.त्‍यांनी घेतलेल्या टेम्पोच्या कर्जाचा हप्ता भरला नसल्याने त्यावरून आरोपींसोबत वाद झाला. या वादातून आरोपींनी शिवीगाळ करून फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकाच्या डोळ्यांत मिरची पावडर टाकली. त्यानंतर त्यांना डोक्‍यात मारहाण करून दुखापत केली. या प्रकरणाचा पुढील तपास चिखली पोलीस ठाणे करीत आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें