घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

मोहोर गळाल्याने आंबा उत्पादक संकटात

भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यात प्रामुख्याने पारंपरिक पद्धतीने भात शेती केली जाते. त्याचबरोबर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. आंब्यांच्या झाडांवर हवामान बदल, ढगाळ वातावरण, चिकटा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.मोहोर मोठ्या प्रमाणात गळून पडला आहे. त्यामुळे आंबा उत्पादक संकटात सापडले आहे. उत्पादन घट होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यात आंब्याला मोहोर येण्यास सुरुवात होते. यंदा थंडीचे प्रमाणात चांगले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आंब्यांना मोहोर लगडला होता. आंब्यांचे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मागील दोन आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात मोहोर झडून गेला.

यातून वाचलेल्या मोहाराचे रुपांतर आंब्यात होत असताना चिकटा रोगामुळे फळ गळती झाल्याने या हंगामात आंब्याचे ६० ते ६५ टक्क्यांपर्यंत उत्पादन घटण्याची शक्यता असल्याचे शेतकरी हवालदिल झाले आहेत. यामुळे आंबा उत्पादनावर आधारित प्रक्रिया उद्योग संकटात सापडला आहे.

उन्हाच्या झळांमुळे गुणवत्तेवर परिणामभोर तालुक्यात सद्या दिवसाचे तापमान ३२ ते ३६ अंश सेल्सिअस आणि रात्रीचे तापमान १८ ते २२ अंश सेल्सिअसचे असते. तापमानामुळे गोटीच्या आकाराचे आंबे पिवळे होऊन फळ गळती होत असून देठाजवळ काळे डाग पडलेला आंब्यांची फळे गळून पडत आहे. यामुळे हापूस, केसर, गावरान आंबे याचे उत्पादन घटू शकते.

उन्हाच्या झळांमुळे आंब्यांचा गुणवत्तेवर आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो.पिवळे चिकट सापळ्यांचा वापर करातुडतुडे, मावा ही कीड झाडाचा रस शोषण पानांवर आणि मोहरावर चिकट पदार्थ सोडते. ज्यामुळे काळी बुरशी येऊन प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया थांबते. मोहोर आणि लहान फळे मोठ्या प्रमाणात गळून पडतात तसेच झाडाची वाढ खुंटते.

किडीवरील नियंत्रणासाठी पहिल्या फवारणीत इमिडाक्लोप्रिड (०.५ मि.ली. प्रतिलिटर पाणी) आणि दुसऱ्या फवारणीत थायामेथोक्झाम (१ ग्रॅम) वापरावे. झाडाच्या फांद्यांची छाटणी करून बागेत हवा खेळती ठेवावी. पिवळे चिकट सापळ्यांचा वापर करावा, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें