घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

शुक्रवारी शिवजयंतीनिमित्त लोणावळ्यातील आठवडे बाजार बंद

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त लोणावळा शहरात होणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर शहरातील आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्या वतीने याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असून शहरात भव्य शिवज्योत मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक भांगरवाडी रस्ता तसेच हनुमान टेकडी रस्ता या मार्गांवरून जाणार आहे.

मिरवणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती आणि वाहनांची वर्दळ वाढण्याची शक्यता असल्याने परिसरात वाहतूक कोंडी होऊ शकते.नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी शहरातील आठवडे बाजार त्या दिवशी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नगरपरिषदेने व्यापारी व नागरिकांना या निर्णयाचे सहकार्य करण्याचे आवाहन केले असून शिवजयंतीचे कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचेही सांगितले आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें