पिरंगुट परिसरात शुक्रवारी (ता. ६) तिथीप्रमाणे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. घोटावडे फाटा येथील शिवशक्ती चौकात तहसीलदार विजयकुमार चोबे व वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष गिरगोसावी यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी माजी उपसभापती भानुदास पानसरे, नानासाहेब शिंदे, दगडुकाका करंजावणे, राहुल पवळे, सचिन खैरे, सुनील वाडकर, रविकांत धुमाळ, सागर काटकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष राम गायकवाड, संतोष शिंदे, नीलेश शिंदे यांनी केले होते. खारवडे येथील ग्रामस्थांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.












