घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

अत्याचारास विरोध केल्याने महिलेचा गळा दाबून खून

हडपसर-सासवड रस्त्यालगत वडकी येथे अनोळखी महिलेच्या खुनाचा गुन्हे शाखेने उलगडा केला. लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर संतापातून आरोपीने महिलेचा गळा दाबून आणि डोक्यात दगड घालून खून केल्याचे तपासात समोर आले असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

प्रकाश बिभीषण माने (वय २९, रा. वडकी नाला, ता. हवेली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवे घाटाच्या पायथ्याशी वडकी गावात काची कंपनीच्या गोदामाशेजारील मोकळ्या जागेत तीन मार्च रोजी ३० ते ४० वर्षे वयोगटातील एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता.

या प्रकरणी फुरसुंगी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हे शाखेच्या युनिट सहाचे पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या सूचनेनुसार पोलिस अंमलदार अमित कांबळे, तानाजी देशमुख आणि पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने छाननी केली. त्यातून संशयिताची ओळख पटली. त्यानुसार आरोपी प्रकाश माने याला ताब्यात घेतले.

चौकशीत माने याने संबंधित महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने त्यास विरोध केल्याने संतापाच्या भरात त्याने तिचा गळा दाबून आणि डोक्यात दगड घालून तिचा खून केल्याचे उघड झाले.

दरम्यान, या प्रकरणी फुरसुंगीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमोल मोरे यांनी फिर्याद दिली होती. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे आणि साहाय्यक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने केली.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें