घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

मॉडेल कॉलनीत तरुणींकडे पाहून गैरवर्तन करणाऱ्यास अटक

शिवाजीनगर परिसरातील मॉडेल कॉलनी येथे मोटारीत बसून तरुणींकडे पाहत अश्लील कृत्य करणाऱ्या एका तरुणाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी एका महिलेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

प्रणव केदार वझे (रा. मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वझे हा मॉडेल कॉलनी परिसरातील एका महाविद्यालयाजवळ मोटार घेऊन येत असे.

तेथे मोटार उभी करून जाणाऱ्या तरुणींकडे पाहत तो अश्लील कृत्य करत होता. काही महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता.याबाबत एका महिलेने याबाबत पोलिसांत तक्रार दिल्यानंतर सापळा रचून वझे याला ताब्यात घेतले.

सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वझे हा एका अधिकाऱ्याचा मुलगा असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें