घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुण्यातील वाढत्या प्रदूषणावर नगरसेवकांची चिंता, बांधकामांवर नियंत्रणाची मागणी

शहरातील वाढत्या हवा प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या अनियंत्रित बांधकामांवर कठोर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी नगरसेवक पुनीत जोशी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी आयुक्त नवलकिशोर राम यांना पत्र दिले आहे.

अलीकडेच शहरातील वाढत्या हवा प्रदूषणावर बातमी प्रसिद्ध केली आहे. त्या पार्श्वभूमीवर हे पत्र देण्यात आले असून बांधकामांमुळे निर्माण होणाऱ्या धूळप्रदूषणावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पत्रात म्हटले आहे की, शहरात मोठ्या प्रमाणावर इमारत बांधकामे सुरू असून रस्त्यांवरून जाणारे रेडीमिक्स सिमेंटचे ट्रक, डंपर आणि बांधकाम साहित्याची वाहतूक यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तसेच अपघातांची शक्यताही वाढत आहे. जुनी इमारत पाडताना किंवा नवीन बांधकाम करताना धूळ मोठ्या प्रमाणावर हवेत उडते. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो.

यासाठी बांधकामस्थळी सुरक्षेसाठी जाळी व प्रतिबंधक पडदे लावणे, धूळ नियंत्रणासाठी कापड किंवा नेट बसविणे तसेच आवश्यक ठिकाणी नियमित पाण्याचा फवारा मारणे बंधनकारक करावे, अशी मागणी जोशी यांनी केली आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें