संपूर्ण जगात शांतता प्रस्थापित व्हावी, या उद्देशाने दापोडी येथील मदरशामध्ये विविध धर्मगुरू व नागरिकांच्यावतीने सामूहिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी हिंदूंनी संकष्टी चतुर्थी, मुस्लिमांनी रोजा आणि ख्रिश्चन बांधवांनी ‘लेंत’ उपवास सोडून सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.
दापोडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय वाघमारे, महापालिकेच्या शहर सुधार समितीचे अध्यक्ष संजय काटे, राजू भास्कर, नवनाथ कांबळे, दत्ता फुलसुंदर, विलास पवार आदी मान्यवरांच्या हस्ते उपवास सोडण्यात आला.
यावेळी फादर सुभाष गायकवाड, फादर भरत हिवाळे, फादर सुवास वंजारे, फादर सुभाष जाधव, मौलाना करी इक्बाल, मौलाना वसीम शेख, मौलाना नजीर साहेब, मौलाना रफिक शेख, कीर्तनकार सुरेश किंडरे, माणिक काळभोर, धनंजय बाईत, बौद्ध धर्मीयांचे धम्मचारी शक्यमित्र, मिलिंद शक्य, धम्ममित्र संतोष साळवे, जैन समाजाचे ललित सोलंकी, प्रवीण सोलंकी, राजीव कर्नावट उपस्थित होते. रवींद्र बाईत यांनी सूत्रसंचालन केले. सतीश पटेकर यांनी आभार मानले.












