घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

वाल्ह्यात विद्यार्थ्यांकडून रंगाची उधळण

वाल्हे (ता. पुरंदर) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शनिवारी (ता. ७) रंगपंचमी उत्सव साजरा करून आनंद आणि पर्यावरणाची काळजी यांचा सुंदर संगम दाखविला. शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली चिमुकल्यांनी कोरडे व नैसर्गिक रंग वापरून रंगांचा उत्सव साजरा केला.

शनिवारी विविध रंगांची उधळण करीत चिमुकल्यांसह तरुण, तरुणी आणि महिलांनी रंगपंचमीचा आनंदोत्सव साजरा केला. बहुतांश ठिकाणी पिचकाऱ्यांतून रंगांची बरसात करीत चिमुकले चिंब झाले होते, तर कोरड्या व नैसर्गिक रंगांचा वापर करताना पाण्याचा अपव्यय होणारी नाही याची खबरदारी घेत वाल्हे शाळेतील बालगोपाळांनी अनोख्या, नावीन्यपूर्ण पद्धतीने रंगपंचमीचा रंगोत्सव साजरा केला.

यावेळी चिमुकल्यांच्या निरागस चेहऱ्यावर अनेक रंग खुलल्याचे पहावयास मिळाले.शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक भारत वाघोले यांनी सांगितले की, ”या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना रंगपंचमीचा आनंद देताना आरोग्य आणि पर्यावरण जपण्याचे महत्त्व पटविणे होता.

”कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन सहशिक्षिका जयश्री पवार, अनिता वाघोले, कीर्ती लिपारे, नयना पवार यांनी केले. या उपक्रमात इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें