घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा पुणे पोलिसांनी वाचवला असा जीव!

पुण्यातील सिंहगड रोड परिसरात एका 39 वर्षांच्या व्यक्तीला आत्महत्येपासून वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे. कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल उचलण्यासाठी निघालेल्या या व्यक्तीला नांदेड सिटी मार्शलच्या सतर्कतेमुळे जीवनदान मिळाले.लोहगाव पोलीस ठाणे आणि नांदेड सिटी पोलीस यांच्यातील योग्य समन्वयामुळे हा थरार सुखरूप संपला.

काय आहे प्रकरण?

शिवणे परिसरात राहणारे प्रदीप दीपकराव चंदनशिव (वय 39) हे घरगुती त्रासाला कंटाळून टोकाचा निर्णय घेण्याच्या तयारीत होते. या घटनेची माहिती मिळताच लोहगाव पोलीस ठाण्याने तातडीने हालचाली केल्या. त्यांनी तांत्रिक मदतीने संबंधित व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक केले आणि ही माहिती सिंहगड रोडवरील नांदेड सिटी मार्शल पोलीस खराडे आणि होमगार्ड राऊत यांना कळवली. माहिती मिळताच पोलिसांनी कोणताही वेळ न घालवता त्या दिशेने धाव घेतली.

शेतकऱ्यांची मदत आणि थरारक पाठलाग

पोलीस कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला संबंधित व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला, मात्र ते सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देत होते. त्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. घटनास्थळी पोहोचल्यावर सुरुवातीला ती व्यक्ती कोठेही दिसून आली नाही. मात्र, तिथे शेतात काम करणाऱ्या काही शेतकऱ्यांनी पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली.

एका लाल कपड्यांमधील व्यक्तीने त्याचे चारचाकी वाहन एका ठराविक दिशेला नेल्याचे त्यांनी सांगितले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने पाठलाग सुरू केला आणि शेवटी वर्णनाप्रमाणे त्या व्यक्तीला शोधून काढले.

पोलिस स्टेशनमध्ये समुपदेशन आणि सुटका

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीने घरगुती त्रासामुळे आपण हे पाऊल उचलण्यास निघाल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला सुरक्षितपणे नांदेड सिटी पोलीस स्टेशन येथे आणले. या घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली असून त्यांनाही पोलीस ठाण्यात पाचारण करण्यात आले. वेळेवर मिळालेल्या माहितीमुळे एका व्यक्तीचे प्राण वाचले असून, या कामगिरीबद्दल पोलीस मार्शलचे कौतुक होत आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची प्रतिक्रिया

लोहगाव पोलिसांकडून माहिती मिळताच आमच्या मार्शलनी तत्परतेने काम केले. वेळेत लोकेशन ट्रॅक झाल्यामुळे आणि शेतकऱ्यांच्या मदतीमुळे एका व्यक्तीचे प्राण वाचवता आले, अशी प्रतिक्रिया नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी दिली आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें