घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुण्यात मार्केटयार्ड परिसरात गोळीबार; तरुण गंभीर जखमी

पूर्वीच्या वादातून एका तरुणावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (दि. 6) रात्री सव्वाअकराच्या सुमारास घडली. शिवजयंतीची मिरवणूक पाहून हा तरुण घराकडे परतत होता, त्यावेळी मार्केटयार्ड परिसरात ही घटना घडली, या हल्ल्यात मोजेश मलिकार्जुन शेकापुरे (वय 20, रा.काकडेवस्ती, कोंढवा रोड) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

त्याच्यावर दोन गोळ्या झाडण्यात आल्या असून, एक गोळी त्याच्या पाठीत लागली आहे. सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात राम उपाम (वय 30), बालाजी उमाप (वय 22) राजू उमाप (वय 55, राहणार तिघे मीनाताई ठाकरे वसाहत गुलटेकडी), हर्षद ढोरे (वय 30), सिद्धार्थ गायकवाड (वय 28), गोविंद कुंभार ( राहणार सर्व सहकारनगर, अरण्येश्वर), आनंद उमाप (वय 22, रा. वडगाव, सिंहगड रोड) आणि इतर दोन अशा नऊ जणांच्या विरुद्ध आर्म ॲक्टसह खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील बालाजी, साहिल, राजू, शुभम आणि आनंद यांना मार्केटयार्ड पोलिसांनी, तर इतर दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने बारा तासांच्या आत पकडले आहे. यातील बहुतांश आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित जगताप यांनी सांगितले.

याबाबत मोजेश याचा भाऊ सागर शेकापुरे (वय 29, रा. काकडेवस्ती, कोंढवा रोड) याने फिर्याद दिली आहे. मागील वर्षी नवरात्रोत्सवाच्या वेळी दाढीला हात लावण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून हा हल्ला करण्यात आला आहे.

फिर्यादी सागर हा सिंहगड कॉलेज परिसरात कॉफी शॉप चालवतो. तो 6 मार्च रोजी 11.30 च्या सुमारास सागर शेकापुरे आणि हसन अलीरजा शेख यांच्यासह मुकुंदनगर परिसरात शिवशक्ती मित्रमंडळाच्या शिवजयंती मिरवणुकीसाठी गेला होता.

मिरवणूक संपल्यानंतर ते घरी निघाले. यावेळी सागर याचा भाऊ मोजेश शेकापुरे आणि त्याचा मित्र निखिल ज्ञानोबा लगाडे हे देखील त्यांच्यासोबत होते. सर्वजण दुचाकीवरून वखार महामंडळ चौक ते गंगाधाम चौक या रस्त्यावरून जात असताना अचानक तीन दुचाकींवरून आलेल्या नऊ जणांच्या टोळीने त्यांचा पाठलाग केला.

या टोळीतील बालाजी उमाप आणि राम उमाप यांनी मोजेश शेकापुरे यांच्यावर पिस्तुलातून दोन वेळा गोळीबार केला, तर हर्षल ढेरे आणि सिद्धार्थ गायकवाड यांनी लोखंडी शस्त्र दाखवत धमकी देत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तसेच राजू उमाप, आनंद उमाप आणि अन्य दोन जणांनी दुचाकीवरून पाडण्याचा प्रयत्न केला. गोळी मोजेश शेकापुरे याच्या पाठीवर लागल्याने तो जखमी झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. जखमी अवस्थेत याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें