घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे आज लोकार्पण

पुणे विद्यापीठ चौकातील बहुप्रतीक्षित एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण आज रविवारी (दि. 8) सकाळी 10 वाजता होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात येणार आहे.

या उड्डाणपुलामुळे विद्यापीठ रस्ता, पाषाण आणि बाणेर परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कमी होऊन वाहनचालकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पूर्ण केला असून, शहरातील वाहतूक व्यवस्थेला गती देण्यासाठी हा पूल महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री व पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

याशिवाय विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि पुण्याच्या महापौर मंजूषा नागपुरे यांची उपस्थिती राहणार आहे.

तसेच खा. मेधा कुलकर्णी, खा. सुप्रिया सुळे, खा. श्रीरंग बारणे, खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह जिल्ह्यातील विधानपरिषद व विधानसभा सदस्यही या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

प्रवासाचा वेळ होणार कमीपुण्यातील सर्वाधिक वर्दळीच्या चौकांपैकी एक असलेल्या विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन या एकात्मिक दुमजली (डबलडेकर) उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे. मेट्रो मार्गिका आणि उड्डाणपूल अशा एकत्रित रचनेमुळे सिग्नलवरील ताण कमी होऊन वाहनचालकांचा प्रवास अधिक जलद आणि सुलभ होणार आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें