घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुण्यातील पंचायत समित्यांचे कारभारी ठरले; दहा ठिकाणी राष्ट्रवादीचे सभापती

पुणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या (Panchayat Samiti) निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसेने (ncp) वर्चस्व मिळविले आहे. सोमवारी जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती निवडले गेले आहेत.

दहा पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती झाले आहेत. तर आठ उपसभापती झाले आहेत. पुरंदरमध्ये राष्ट्रवादीने शिंदेसनेला उपसभापतीपद दिले आहे. तर भोर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या वेल्हे, मुळशी, भोर तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे सभापती, उपसभापती झाले आहेत. दौंडमध्ये भाजप, खेडमध्ये उबाठा, जुन्नरमध्ये शिंदेसेनेचे सभापती व उपसभापती झाले आहेत.

मुळशीत मांडेकरांनी समीकरणं जुळविलेमुळशी, भोर, वेल्हा या तिन्ही पंचायत समित्या राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर (Shankar Mandekar) यांनी ताब्यात घेतल्या. मुळशी पंचायत समितीमध्ये कोणत्या पक्षाला बहुमत नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेसने तीन, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) दोन सदस्य निवडून आले होते. तर भाजपला केवळ एक जागा जिंकता आली.

या ठिकाणी शरद पवार गटाला बरोबर घेऊन सभापतीपद मिळविण्यासाठी भाजपचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा प्रयत्न होता. पण मांडेकर यांना पवार गटाचे दोन सदस्य बरोबर घेत सत्ता मिळविली आहे. पवार गटाकडे उपसभापतीपद दिले आहे.

जुन्नर

सभापती-कमल बाळू शेळकंदे-शिवसेनाउपसभापती-अमित अनंता ढोले-शिवसेना-उबाठा———-

आंबेगाव

सभापती-कैलास भिमाजी काळे-राष्ट्रवादीउपसभापती-ज्योती प्रवीण पारधी-राष्ट्रवादी—————-

शिरुरसभापती-स्वाती विठ्ठल घावटे-राष्ट्रवादीउपसभापती-रामराव बबन सासवडे-राष्ट्रवादी———

खेड

सभापती-विद्या सयाजी मोहिते-शिवसेना-उबाठाउपसभापती-मंगेश गुलाब सावंत-शिवसेना-उबाठा———

मावळ

सभापती-सुनीता मनोहर येवले-राष्ट्रवादीउपसभापती-साहेबराव नारायण कारके-राष्ट्रवादी

दौंड

सभापती-सुखदेव सोनबा चोरमले-भाजपउपसभापती-अमृता अभिमन्यू गिरमकर-भाजप———

बारामती

सभापती-किरण रावसाहेब तावरे-राष्ट्रवादीशुभांगी सुनील आगवणे-राष्ट्रवादी———–

पुरंदर

सभापती-अमित भाऊसाहेब झेंडे-राष्ट्रवादीउपसभापती-प्रवीण बाळासाहेब जगताप-शिवसेना-शिंदे———

इंदापूर

सभापती-हर्षवर्धन मधुकर लोंढे-राष्ट्रवादीउपसभापती-जयकुमार गोपाळ कारंडे-राष्ट्रवादी——–

भोर

सभापती-मनिषा संतोष कंक-राष्ट्रवादीउपसभापती विलास सुभाष कोंडे-राष्ट्रवादी———-

मुळशी

सभापती-मंदा कृष्णराव शेळके-राष्ट्रवादीउपसभापती-दगडू नामदेव करंजावणे-राष्ट्रवादी-शरद पवारवेल्हा-राजगड

सभापती-सुवर्णा किरण राऊत-राष्ट्रवादीउपसभापती-संदीप लहू खुटवड-राष्ट्रवादी———–

हवेली

सभापती-युवराज हिरामन काकडे-राष्ट्रवादीउपसभापती-विद्या दत्तात्रय गायकवाड-राष्ट्रवादी

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें