घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

दोन लाखांची लाच मागितल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा

तक्रारदाराविरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून बंडगार्डन पोलिस ठाण्यात कार्यरत एका उपनिरीक्षकाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने गुन्हा दाखल केला आहे.या कारवाईमुळे शहर पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात ४० वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. ‘एसीबी’ने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्तीच्या विरोधात एका व्यक्तीने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फसवणुकीसंदर्भात अर्ज केला होता. या अर्जाची चौकशी पोलिस उपनिरीक्षक संदीप खेडकर (रा. वानवडी) करत होते.

या प्रकरणात तक्रारदाराविरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी खेडकर यांनी दोन लाख रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने तीन फेब्रुवारी रोजी ‘एसीबी’कडे तक्रार केली. पडताळणीदरम्यान खेडकर यांनी स्वतःसाठी आणि वरिष्ठांसाठी मिळून तडजोडीअंती एक लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार उपनिरीक्षकाविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात ९ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’एसीबी’ पुणे विभागाचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त नीता मिसाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर करत आहेत. दरम्यान, कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाच मागत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें