घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

उरुळी कांचन येथे यात्रेच्या दिवशीच गेला एकाचा अपघातात बळी

उरुळी कांचन येथे (रविवार व सोमवार) आज रात्री १२.३० चे सुमारास पुणे सोलापूर महामार्गावरील तळवाडी चौकात महामार्ग ओलांडून शिंदवणे रोडवरील आपल्या राहत्या घराकडे निघालेल्या उत्तम बबन भंडारे (वय-५३ वर्ष) यांचा, बल्कर क्र.एमएच १२ एस एक्स ८९८५ ने जोरात धडक देत चाकाखाली चिरडल्याने जागेवर मृत्यू झाल्याची घटना उरुळी कांचन गावच्या यात्रेच्या शेवटच्या दिवशी घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रिती मयूर शेंबेकर (मयताची मुलगी, वय -३० वर्ष, धंदा-गृहिणी, रा. दुर्गा कॉलनी १, डांगे चौक, चिंचवड, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार बल्कर ट्रक नंबर एमएच १२ एस एक्स ८९८५ वरील चालक प्रणव प्रदीप शिंदे (वय-२० वर्ष पत्ता माहित नाही) याचेविरुद्ध बी.एन.एस.का.कलम २८१, १२५(अ), १२५(ब), १०६(१), मो. वा. अधि १८४ या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, उत्तम बबन भंडारे व त्यांचे कुटुंबीय उरुळी कांचन गावच्या यात्रेनिमित्त दर्शन व कार्यक्रम पाहून उशिरा घरी निघाले होते, चौकात आल्यावर निम्मा रस्ता ओलांडून मध्यभागी डिव्हायडर वर थांबले होते.

सोलापूर रोडवरील वाहनांची रहदारी कमी झाल्यानंतर सोलापूर पुणे बाजूचा रस्ता पायी चालत ओलांडत असताना अचानक बल्कर ट्रक नंबर एमएच १२ एसएक्स ८९८५ सोलापुर बाजुकडुन पुणे बाजुकडे भरधाव वेगात येवुन उत्तम बबन भंडारे यांना धडक देवुन त्यांच्या अंगावरून गेल्याने ते जागीच मयत झाले आहेत.

उरुळी कांचन गावच्या यात्रेच्या शेवटच्या दिवशी कुटुंबियांच्या देखत घटना घडल्याने कुटुंबियांना मानसिक धक्का बसला असून बेजबाबदार ड्रायव्हर वर कडक कारवीच्या मागणीने जोर धरला आहे. पोलीस तपास सुरु आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें