घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

आरोपीस केले जेरबंद, एकुण १८,५०,०००/- कि. रु. चा सोन्याचे दागीने केले हस्तगत

पुणे : प्रतिनिधी

खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात प्रवेश करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास करणाऱ्या सराईत गुन्हेगारास पुणे गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केली असून, त्याच्याकडून तब्बल १८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दि. ०७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.४५ ते दुपारी १.३० वाजण्याच्या दरम्यान, येरवडा परिसरातील एस.जी. सुपरमार्केट व लेडीज टेलर (सर्व्हे नं. १५३/२, शंकरराव जाधवनगर) येथे फिर्यादी काम करत असताना एक अनोळखी इसम खरेदीच्या बहाण्याने दुकानात आला. यावेळी फिर्यादी यांनी शिलाई मशीनजवळ पिशवीत ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून तो इसम पसार झाला.

या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ०७/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ (अ) अन्वये दि. ०९/०१/२०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, दि. १८/०१/२०२६ रोजी पुणे गुन्हे शाखेचे दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक क्रमांक २ पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार राहुल इंगळे व प्रफुल्ल मोरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हडपसर माळवाडी सिरम कंपनीजवळील जुन्या कॅनलवरील पुलाजवळ एक संशयित इसम स्कुटरसह सोन्याचे दागिने विक्रीसाठी थांबलेला आहे.

माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिस पथकाने सापळा रचून जयेश चंद्रशेखर खिच्ची (वय ३९ वर्षे, रा. मांजरी खुर्द, पुणे) याला ताब्यात घेतले. अंगझडतीदरम्यान त्याच्याकडून

  • एक सोन्याचे मोठे मंगळसूत्र
  • एक लहान मंगळसूत्र
  • कानातील झुमके जोड
  • एक सोन्याची अंगठी
    असे एकूण १३८ ग्रॅम १९० मिली सोन्याचे दागिने तसेच अॅक्टीव्हा स्कुटर असा १८,५०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर हडपसर, चंदननगर, वानवडी, कोंढवा, लोणीकंद आदी पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त श्री. निखील पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. या कामगिरीत सी.बी. बेरड, एस.जे. तानवडे, कैलास चव्हाण, राजु पुणेकर, परेश सावंत, गणेश लोखंडे, दत्तात्रय खरपुडे, मयुर सूर्यवंशी, राहुल इंगळे, प्रफुल्ल मोरे, विनायक येवले, संदीप येळे व विक्रांत सासवडकर यांनी सहभाग घेतला.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें