घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

दौंड पंचायत समितीत भाजपचे निर्विवाद वर्चस्व

दौंड पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने माघार घेतल्यामुळे भाजपाचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. सभापतीपदी भाजपचे सुखदेव सोनबा चोरमले तर उपसभापतीपदी अमृता अभिमन्यू गिरमकर यांची बिनविरोध निवड झाली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ लबडे यांनी दिली.

सोमवारी (९ मार्च) दौंड पंचायत समितीच्या सभागृहात सभापती व उपसभापती पदाच्या निवड प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले होते. सभापती पदासाठी भाजपाकडून सुखदेव सोनबा चोरमले, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदीप किसन दिवेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उपसभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मनिषा संतोष ताकवणे, तर भाजपकडून अमृता अभिमन्यू गिरमकर यांनी अर्ज सादर केला होता.

मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत प्रदीप दिवेकर यांनी सभापतीपदाचा, तर मनिषा ताकवणे यांनी उपसभापतीपदाचा अर्ज मागे घेतला. त्यामुळे सभापतीपदी सुखदेव चोरमले आणि उपसभापतीपदी अमृता गिरमकर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा रेवणनाथ लबडे यांनी केली. दौंड पंचायत समिती निवडणुकीत भाजपाचे ८ सदस्य, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ६ सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे पंचायत समितीत भाजपाकडे स्पष्ट बहुमत असून या निवडणुकीत भाजपाचे वर्चस्व अधोरेखित झाले आहे.

भाजपच्या विनंतीनंतर उमेदवारी अर्ज मागे

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून सभापतीपदासाठी प्रदीप दिवेकर आणि उपसभापतीपदासाठी मनिषा ताकवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, भाजपकडून निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केल्याने त्यांच्या अर्ज मागे घेण्यात आले, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते शिवाजी ढमाले यांनी दिली.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें