घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

दिवसाढवळ्या व्यापाऱ्याचं अपहरण

पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटनापिंपरी-चिंचवड शहरातील काळेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत पन्नास लाख रुपयांच्या खंडणीसाठी एका व्यापाराचे अपहरण करण्यात आलं होतं. मात्र पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पोलीस पथकाने अपहरण करणाऱ्या आरोपींचे 50 किलोमीटर पाठलाग करून अपहरण झालेल्या व्यक्तीची सुखरूप सुटका केली आहे.

तसेच अपहरण करणाऱ्या पाच आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.काळेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत काल संध्याकाळी साडेपाच वाजता दरम्यान एका चार चाकी वाहनामध्ये पाच जणांनी एका व्यापाऱ्यांच अपहरण केलं होतं. अपहरण करत असल्याची घटना एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाली.

व्हिडिओमध्ये पाहू शकतो की, एका कार जवळ चार ते पाच जण उभे आहेत. त्यावेळी एक व्यक्ती स्कुटी घेऊन तेथे येतो.टोळक्यापैकी एकजण स्कुटी थांबवतो. त्यांना स्कूट बाजुला घ्यायला सांगत असल्याचं दिसतं. त्यानंतर स्कुटीवरील व्यक्ती आपली दुचाकी माघारी वळवतो. तेव्हा टोळ्यामधील एकजण धावत जाऊन त्यांना खाली पाडतो.

मग टोळीतील सर्वजण व्यापाऱ्याला उचलून कारमध्ये कोंबतात. त्यावेळी व्यापारी वाचवा, वाचवा असा आराडाओरड करतो. व्यापाऱ्याचा आराडाओरड ऐकून तेथे अनेकजण जमतात. परंतु ते कोणीच त्यांना वाचवण्यासाठी पुढे सरसावत नाही. दरम्यान पोलिसांनी अवघ्या काही तासात अपहरणकर्त्यांना पकडून व्यापाऱ्याची सुटका केली.

अपहरण केल्यानंतर आरोपी हे नाशिक फाटा मार्गे नाशिक कडे जायला निघाले होते. याची माहिती पिंपरी चिंचवड शहर पोलिसांना मिळताच पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी अहिल्यानगर पोलिसांच्या मदतीने संगमनेर टोल नाक्यावर आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्यांच्या ताब्यातून दोन देशी कट्टे आणि सहा जिवंत काडतुसे आणि एक चार चाकी वाहन असा 18 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें