घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

कट मारल्याच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला

शहरातील कोंढवा परिसरात किरकोळ कारणावरून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. दुचाकी चालवताना ‘कट’ मारल्याच्या वादातून ही मारहाण झाल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणी एका महिलेसह दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या फरार आहेत.या घटनेमुळे भाग्योदयनगर परिसरात काही काळ खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (६ मार्च) रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास तक्रारदाराचा पुतण्या कोंढवा खुर्द येथील मक्का ओम सोसायटी परिसरातून दुचाकीवरून जात होता. यावेळी रस्त्यावरून जाताना त्याचा काही जणांशी वाद झाला.

“कट का मारला?” या कारणावरून दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला आणि काही क्षणांतच तो वाढत गेला.यानंतर एका महिलेसह दोन अल्पवयीन मुलांनी त्या तरुणाला थांबवून त्याच्यावर हल्ला केला. तिघांनी मिळून त्याला बेदम मारहाण केली.

मारहाण करताना तरुणाच्या डोक्यावर वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.घटनेची माहिती मिळताच पुणे शहर पोलीस अंतर्गत येणाऱ्या कोंढवा पोलीस स्टेशन च्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

या प्रकरणी महिलेसह दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी घटना घडल्यानंतर फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक खोपडे करत आहेत. किरकोळ वादातून थेट जीवघेण्या हल्ल्यापर्यंत प्रकरण गेल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें