घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

नवप्रकाश मंडळ भगवा कट्टा प्रतिष्ठानतर्फे किल्ले स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

वाई | प्रतिनिधी : प्रशांत थोरवे

नवप्रकाश मंडळ भगवा कट्टा प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम रविवार, दिनांक १८ जानेवारी रोजी अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास वाई नगरपालिकेचे नगराध्यक्ष अनिल सावंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमास नगरसेवक शैलेंद्र देवकुळे, नगरसेविका सौ. केतकी पाटणे, प्रमुख वक्ते शिवचरित्र अभ्यासक आनंद पटवर्धन, सुनील सोडमिसे, दिलीप शिवदे, काशिनाथ शेलार, राजेंद्र खरात आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. नवप्रकाश मंडळ भगवा कट्टा प्रतिष्ठान हे गेली २५ वर्षे सातत्याने विविध समाजोपयोगी, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबवत असून वाई तालुक्यात एक वेगळी सामाजिक ओळख निर्माण केली आहे. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश सक्षम, सुसंस्कृत व राष्ट्रभक्त पिढी घडवणे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास नव्या पिढीच्या मनात दृढपणे रुजवणे हा असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले.

प्रमुख वक्ते शिवचरित्र अभ्यासक आनंद पटवर्धन यांनी आपल्या ओघवत्या व अभ्यासपूर्ण भाषणातून शिवरायांनी उभारलेल्या किल्ल्यांचे ऐतिहासिक व सामरिक महत्त्व उलगडून सांगितले. तसेच प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना कशी केली, याचे प्रभावी विवेचन केले. त्यांच्या भाषणाने उपस्थितांमध्ये इतिहासाबद्दल नवचैतन्य निर्माण झाले. नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी नवप्रकाश मंडळ भगवा कट्टा प्रतिष्ठानच्या सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांचे मनःपूर्वक कौतुक केले. “अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, शिस्त, कर्तव्यभावना व इतिहासाची जाणीव निर्माण होते. यामुळे निश्चितच एक आदर्श पिढी घडण्यास मोठी मदत होईल,” असे ते म्हणाले. तसेच वाई शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपालिका सातत्याने प्रयत्नशील असून रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, व इतर मूलभूत सुविधांच्या कामांना येत्या काळात अधिक वेग दिला जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. याप्रसंगी कै. सुनिता केशवराव घोटावडेकर यांच्या स्मरणार्थ गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण कार्यक्रम पार पडला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घेण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना पालक व उपस्थितांनी व्यक्त केली. तसेच भारतीय सैन्य दलात विविध पदांवर नियुक्ती झालेल्या योगेश खरात, संकेत कांबळे, निरंजन कुदळे व शंभू शेंडगे या युवकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

त्यांच्या यशाबद्दल उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले. त्यांच्या कार्यामुळे परिसरातील युवकांमध्ये देशसेवेबद्दल विशेष प्रेरणा निर्माण झाली आहे. किल्ले स्पर्धा विविध गटांमध्ये घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये वैयक्तिक मोठा गट, वैयक्तिक छोटा गट, महिला गट, लहान समूह गट व मोठा समूह गट यांचा समावेश होता. या सर्व गटांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. याशिवाय विशेष कार्य व उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल छाया माने यांना ‘हिरकणी पुरस्कार’ तर आदित्य ढगे यांना ‘हिरोजी इंदलकर पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अमित देशमाने यांनी प्रभावी शैलीत केले, तर आभार प्रदर्शन हिंदवी भाटे यांनी मानले. या सोहळ्यास नवप्रकाश मंडळ भगवा कट्टा प्रतिष्ठानचे असंख्य कार्यकर्ते, नवतरुण तसेच वाई शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात शिवकालीन इतिहासाची गाथा, देशभक्तीची भावना आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें