घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

दापवडी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नूतन इमारतीत दिमाखात स्थलांतर ग्रामीण भागातील शेतकरी, महिलांना तत्पर सेवा द्या : रविकांत बेलोशे यांचे आवाहन

वाई प्रतिनिधी : प्रशांत थोरवे

हुमगाव, दि. १० : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दापवडी (ता. जावली) येथील शाखेचे नूतन व सुसज्ज इमारतीत दिमाखात स्थलांतर करण्यात आले. या नवीन इमारतीचे उद्घाटन दत्तात्रय कळंबे महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रविकांत बेलोशे यांच्या हस्ते फित कापून उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या वेळी जिल्हा बँकेचे जावली व सातारा तालुका विभागीय विकास अधिकारी आर. एल. निकम, बसुली अधिकारी एस. एस. निकम, विकास अधिकारी डी. के. दुर्गावळे, दीपक पारठे, शाखा अधिकारी अमर बोडके, ज्योती रांजणे यांच्यासह परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ व बँकेचे ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना रविकांत बेलोशे म्हणाले की, जिल्हा बँकेची ही शाखा प्रामुख्याने ग्रामीण भागात कार्यरत असून शेतकरी, धरणग्रस्त तसेच महिला वर्ग हा या बँकेचा मुख्य आधार आहे. नवीन सुसज्ज इमारतीमुळे ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. बँकेने ग्रामीण भागातील शेतकरी व महिलांना अधिक तत्पर, पारदर्शक आणि वेगवान सेवा देण्यावर भर द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी विभागीय विकास अधिकारी आर. एल. निकम यांनी बँकेच्या विविध लोकोपयोगी योजनांची माहिती देताना सांगितले की, परिसरातील शेतकरी व युवकांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची कर्ज योजना, शैक्षणिक कर्ज तसेच स्ट्रॉबेरी पीक कर्ज यांसारख्या योजनांचा लाभ घेऊन आर्थिक प्रगती साधावी.

दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दापवडी येथील विस्तारित कक्षाचे आता पूर्णवेळ शाखेत रूपांतर झाल्याने काटवली, दापवडी आणि रांजणी-घोटेघर या तीन मोठ्या विविध कार्यकारी सोसायट्यांचे सर्व आर्थिक व्यवहार या शाखेतून होणार आहेत. त्यामुळे ग्राहक व व्यवहारांची संख्या वाढण्याची शक्यता असून कामाचा वाढता ताण लक्षात घेता बँक प्रशासनाने येथे तातडीने कर्मचारी संख्या वाढवावी, अशी मागणी परिसरातील ग्राहक व सभासदांनी केली. कार्यक्रमास काटवली विकास सोसायटीचे अध्यक्ष शंकर पवार, रांजणी-घोटेघर सोसायटीचे अध्यक्ष रामचंद्र रांजणे, दापवडी सोसायटीचे अध्यक्ष बी. एल. रांजणे, गोपाळ बेलोशे, रमेश रांजणे, विलास पाटील, माजी सरपंच संतोष रांजणे, दिनकर शिंदे, रघुनाथ पवार, चंद्रकांत रांजणे, मधुकर रांजणे, अनिल रांजणे, विश्वास रांजणे, भरत रांजणे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाखा प्रमुख अमर बोडके यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर संदीप गोळे व नितीन पोफळे यांनी आभार मानले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें