घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

गावठी पिस्टल व एक जिवंत राऊंड” बेकायदेशीररीत्या बाळगणा-या तीन सराईतांना अटक

फुरसुंगी पोलीस स्टेशन तपास पथकाची उल्लेखनीय कामगिरी एक गावठी पिस्टल व एक जिवंत राऊंड” बेकायदेशीररीत्या बाळगणा-या तीन सराईतांना केले शिताफिने जेरबंद.

दि.०७/०३/२०२६ रोजी तपारापथकातील पोलीस अधिकारी व अंगलदार वरीष्ठांचे आदेशाने फुरसुंगी पोलीस स्टेशनचे हद्दीत अवैद्य धंदे, गुन्हेगार चेकींग, तसेच गुन्हे प्रतिबंध करणेकरीता पेट्रोलिंग करत असताना दि. २३.३० वा. वे सुमारास पोलीस हवालदार नितीन गायकवाड व सागर वणवे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, झांबरे गोठ्याचे जवळ, कोंडे वस्ती, ऊरुळी देवाची, पुणे येथे एका लाल रंगाच्या आय २० कारमध्ये तीन इसग संशयीतरित्या थांबले असून त्यातील एकाकडे पिस्टल सारखे येपण असण्याची शक्यता आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाली.

बात्तगी पोउपनि विनोद पवार व बापुसाहेब खंदारे यांनी वरीष्ठांना कळविली, वरीष्ठांचे आदेशाने पोउनि विनोद पवार व त्यांचे पोलीस पथकाने बातगीची खातरजमा व कारवाई करणेसाठी खबर मिळाल्याचे ठिकाणी पंचासह गेले. बातमीचे ठिकाणाचे थोडे आडबाजूरा थांबुन खात्री केली असता बातमीतील वर्णनाची आय २० कार व त्यामध्ये तीन संशयित इसम बसल्याचे दिसुन आले.

पोलीस पथकाने त्यांना घेराव घालून आहे त्या स्थीतीमध्ये ताब्यात घेतले व त्यांना त्याचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्याची नावे १) शुभम चिमा गायकवाड, वय २५ वर्षे, धंदा काहीनाही, रा. वाल्हेकर यांचेकडे भाडयाने, हिंदवीनगर, ऊरुळी देवाची, ता. हवेली, जि. पुणे, मुळगाव मानेगाव वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर, २) गौरव हनुमंत भाडळे, वय २४ वर्षे, रा. आंबेडकर चौक, ऊरुळी देवाची, ता. हवेली, जि. पुणे. ३) नागेश गोपाळ निलेवाड, वय २३ वर्षे, रा. ढोलेवस्ती, समता शाळेजवळ, ऊरुळी देवाची, ता. हवेली, जि. पुणे असे असल्याचे सांगीतले, सदर ठिकाणी उपस्थित असण्याचे व बावरणेचे कारणाबाबत चौकशी करता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली.

त्यामुळे संशय बळावल्याने ताब्यातील इसमांची अंगझडती दोन पंचासमक्ष घेण्यात आली. त्यामध्ये शुभम चिमा गायकवाड, वय २५ वर्षे, धंदा काहीनाही, रा. सदर याचे कंबरेला एक गावठी पिस्टल व एक जिवंत राउंड मिळुन आला, त्याचे सोबत असलेल्या गौरव भाडळे, नागेश निलेवाड यांनी देखील साथीदारांसोबत येण्याबाबत समाधानकारक माहीती दिली नाही, तसेच त्यांचेकडे हत्यार बाळगण्यावाबत कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे दिसुन आले, घटनास्थळावरून एकुण ५,४१,०००/- रुपये किंमतीचे गावठी पिस्टल, एक जिवंत राऊंड व आय २० लाल रंगाची कार पंचनाम्याने जप्त करण्यात आले.

व संशियीताना ताब्यात घेवुन फुरसुंगी पोलीस स्टेशन येथे येवुन त्यांचा अगिलेख तपासला असता आरोपी शुभम चिमा गायकवाड व नागेश गोपाळ निलेवाड यांचेवर एकत्रित लातूर जिल्हयातील पोलीस ठाणेमध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली. तसेच आरोपी गौरव हनुमंत भाडळे याचेवर लोणीकाळभोर पोलीस स्टेशनमध्ये मारहाणीसह दंगा केल्याचा गुन्हा दाखल आहे.

सर्व आरोपी हे रेकॉर्डवरील व गंभीर गुन्हयातील सराईत गुन्हेगार असल्याचे दिसुन आले आहे. आरोपींनी विनापरवाना पिस्टल सारखे घातक अग्निशस्त्र व एक जिवंत राऊंड बाळगल्या प्रकरणी त्यांचेवर फुरसुगी पोलीस स्टेशन गु.र.नं.८१/२०२६ भारतीय न्याय संहीता कलम ३ (५), भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) व गहाराट्र पोलीस अधीनियग ३७(१) (३) सह १३५ प्रगाणे गुन्हा नोंद करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगीरी मा. डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उपायुक्त, परि- ६. पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली गा. अनुराधा उदगले, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर, श्री. अमोल गोरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे सुचनेप्रगाणे तपास पथक अधिकारी पोउनि श्री विनोद पवार, पोउनि बापुसाहेब खंदारे, पोउनि उमेश जगताप, सहा. पोलीस फौजदार हरिदास कदम, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, सागर वणवे, श्रीनाथ जाधव, पोलीस अंमलदार हेमंतकागथे, अभिजीत टिळेकर सर्व नेमणुक फुरसुंगी पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी प्रशंसनिय कामगीरी केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास विनोद पवार, पोलीस उप-निरीक्षक, फुरसुंगी पोलीस स्टेशन पुणे शहर हे करतआहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें