घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुणेकरांसाठी मनपाचा भन्नाट उपक्रम! ‘क्यूआर’ स्कॅन करा अन् विकासकामे सुचवा

पुणे महापालिकेच्या २०२६-२७ च्या वार्षिक अर्थसंकल्पात पुणेकरांना थेट सहभाग घेता येणार आहे. शहराच्या विकासात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी महापालिकेने ‘माझे पुणे, माझा अर्थसंकल्प’, हा उपक्रम राबविण्यात येत आहे.आपल्या भागात कोणती आवश्‍यक विकासकामे झाली पाहिजे याची सूचना नागरिकांना नोंदविता येणार आहेत, त्यासाठी क्युआर कोडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

‘नागरिकांच्या सहभागातून शहराची प्रगती’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक, उद्याने आणि सार्वजनिक सुविधांबाबतच्या सूचना मागविण्यात आल्या आहेत.नागरिकांच्या गरजा आणि प्राधान्यक्रमाचे प्रतिबिंब महापालिकेच्या अर्थसंकल्पात उमटावे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

महापालिकेच्या संकेतस्थळासह समाजमाध्यमांवर क्यूआर कोड उपलब्ध आहे. हा क्युरआर कोड स्कॅन करून नागरिकांना सूचना नोंदविता येतील. नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन भिमाले यांनी केले आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें