घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पथारी व्यावसायिकांनो थकबाकी भरा, अन्यथा परवाने रद्द

पुणे शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा गंभीर झालेला असताना दुसरीकडे अधिकृत पथारी व्यावसायिकांकडूनही महापालिकेला शुल्क भरण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे आता प्रशासनाने थकबाकी वसुलीची मोहीम सुरु केली आहे.जर ३१ मार्चपर्यंत थकबाकी भरली नाही तर परवानाधारकाला व त्याच्या कुटुंबीयांना काळ्या यादीत टाकले जाणार आहे.

आत्तापर्यंत १२ हजार १५५ परवानाधारकांपैकी केवळ ३ हजार ८४० जणांनी पैसे भरले आहेत. अद्याप ६४ कोटी ५१ लाख ९७ हजार रुपयांची थकबाकी पथारी व्यावसायिकांकडे आहे. पैसे भर अन्यथा परवाना रद्द असे आदेश दिल्याने पथारी व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.केंद्र सरकारने २०१४ मध्ये फेरीवाला धोरण जाहीर केले. त्यानुसार रस्त्यावर विविध प्रकारचे व्यवसाय करणाऱ्या कष्टकऱ्यांना अधिकृतपणे व्यवसाय करण्याचा परवाना दिला गेला.

यामध्ये प्रत्येकाचे बायोमॅट्रीक सर्वेक्षण करण्यात आले त्यांना अ, ब, क,ड, इ या या श्रेणीनुसार परवाना देण्यात आले. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात २३ हजार १६६ जणांची नोंदणी करण्यात आली.त्यापैकी १२ हजार १५५ जणांचे शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील ५२५ झोनमध्ये पुनर्वसन करण्यात आले. तर उर्वरित परवानाधारक कोठेच व्यवसाय करत नसल्याचे निदर्शनास आल्याने त्यांचे परवाने रद्द केले आहेत.

महापालिकेने कोरोना काळात पथारी व्यावसायिकांचे व्यवसाय बंद असल्याने त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यामुळे स्थायी समितीने या काळातील सुमारे १२ कोटी रुपये शुल्क माफ केले होते. पण त्यानंतरही अनेक व्यावसायिकांनी नियमीत शुल्क भरणा करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ही रक्कम वाढत जाऊन ६६ कोटी पर्यंत पोचली होती.वसुलीसाठी निर्वाणीचा इशारा२०१८ पासून महापालिका प्रशासनाकडून पथारी व्यावसायिकांकडून शुल्क वसुलीसाठी प्रयत्न सुरु आहेत.

पण राजकीय वरदहस्त, संघटनांचा दबाव आणून पैसे भरण्याकडे टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे ही थकबाकीची रक्कम वाढत गेली आहे. महापालिकेत पथारी व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व करणारी शहर पथविक्रेता समिती स्थापन केली.त्यात थकबाकी वसूल केली नाही तर कारवाई केली जाईल असा प्रस्ताव मंजूर करून घेतला आहे. पण समितीच्या सदस्यांनी हा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला पण त्यावर कोणतीही चर्चा केलेली नाही अशी भूमिका घेतली आहे.

महापालिका प्रशासने १ जानेवारी ते ३१ मार्च या तीन महिन्याच्या काळात थकबाकी भरण्यासाठी मुदत दिली आहे.३१ मार्चपर्यंत थकबाकी भरली नाही तर परवाने रद्द करण्याचा निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पुढील फेरीवाला सर्वेक्षणात परवानाधारक व त्याच्या कुटुंबीयांना सहभाग घेता येणार नाही असा नियम केल्याने त्याची झळ संपूर्ण कुटुंबाला बसणार आहे.

‘परवानाधारक पथारी व्यावसायिकांनी नियमीत शुल्क भरावे यासाठी बरेच प्रयत्न केले. पण त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. शहर फेरीवाला समितीमध्ये झालेल्या निर्णयानुसार थकबाकी वसुलीची मोहीम सुरु केली आहे. यात ज्यांची थकबाकी राहील त्यांचे परवाने रद्द करून त्यांना काळ्या यादीत टाकले जाणार आहे. थकबाकी भरण्यासाठी आणखी मुदत आहे, थकबाकीदारांनी पैसे भरून पुढील कारवाई टाळावी.’

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें