घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

लग्नाला नकार दिल्याच्या कारणावरून महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला

पुण्याच्या जुन्नर शहरात असणाऱ्या आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर तिच्याच गावच्या युवकाने लग्नाला नकार दिल्याचा राग मनात धरून कोयत्याने हल्ला केला.

या हल्ल्यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जुन्नर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर हल्ला करणारा आरोपी पसार झाला असून जुन्नर पोलिस आरोपीचा तपास करत आहेत.

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जुन्नर येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात राहणारी गौरी संजय साळवे (वय – १८) ही विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे सकाळी वसतिगृहातून बाहेर पडली. याचवेळी तिच्या मूळ गावचा असणारा युवक महेश मुरलीधर डामसे या युवकाने तिच्यावर कोयत्याने हल्ला केला.

आरोपीने विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर व मानेवर वार केल्याची माहिती समोर येत आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हल्ल्यानंतर आरोपी महेश डामसे घटनास्थळावरून तत्काळ फरार झाला.

स्थानिक नागरिकांनी जखमी विद्यार्थिनीला उपचारासाठी जुन्नर येथील खासगी रुग्णालयात दाखल केलय.जखमी विद्यार्थी व आरोपी दोघेही एकाच गावातील रहिवाशी असून लग्नाला नकार दिल्याचा राग मनात धरून आरोपीने सदर हल्ला केल्याचा जबाब जखमी विद्यार्थिनीने पोलिसांना दिला आहे. जुन्नर पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून फरार आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें