घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

गॅससाठी चाकण येथे पहाटेपासून रांगा

चाकण परिसरात घरगुती गॅस सिलिंडरसाठी गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांच्या लांब रांगा लागत आहेत. गॅस वितरकांसमोर पहाटेपासून १०-१० तास उभे राहूनही सिलिंडर मिळत नसल्याने कामगार आणि महिलांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

औद्योगिक पट्टा असलेल्या चाकणमध्ये लाखो कामगार वास्तव्यास आहेत. मध्यपूर्वेतील युद्धस्थिती आणि पुरवठ्यातील ताणामुळे केंद्र सरकारने ””एस्मा” (ESMA)” कायदा लागू केला असला, तरी स्थानिक पातळीवर वितरण व्यवस्था कोलमडली आहे.

राजू यादव, नाना गायकवाड या कामगारांनी सांगितले की, कामावर जाण्याऐवजी गॅससाठी रांगेत उभे राहावे लागत असल्याने रोजंदारी बुडत आहे. दुसरीकडे, गॅस फिलिंग प्लांटमधून पुरवठा कमी झाल्याचे वितरकांचे म्हणणे आहे.

तर वितरक कर्मचाऱ्यांच्या मते, गॅस संपण्याच्या भीतीने नागरिक आगाऊ साठवणूक करण्यासाठी गर्दी करत आहेत. बुकिंग नसतानाही अनेकजण रांगेत उभे राहत असल्याने गोंधळ वाढत आहे. मात्र, गॅस सिलिंडरसाठी बुकिंग होत नाही.

तसेच ग्राहकांनी घरपोच गॅस मिळत नसल्याने रांगेत उभे राहावे लागत आहे.”घरगुती वापराच्या एलपीजी गॅसचा कोणताही तुटवडा नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. गॅस घरपोच दिला जातो.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें