घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेमुळे ३० रुग्णांना नवी दृष्टी

पुणे प्रतिनिधी :
समाज सेवा हीच आमची ओळख
या ब्रीदवाक्याला अनुसरून स्व. राजेंद्र रामबिलास मुंदडा चॅरिटेबल फाउंडेशन संचालित माय माऊली केअर सेंटर, कात्रज (पुणे), समता फाउंडेशन, मुंबई आणि एच. व्ही. देसाई हॉस्पिटल, मोहम्मदवाडी (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू व लेन्स शस्त्रक्रिया उपक्रम राबविण्यात आला. बुधवार, दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी या उपक्रमांतर्गत एकूण ३० गरजू नागरिकांना मोफत शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले.

कात्रज येथील माय माऊली केअर सेंटर येथून या रुग्णांना एच. व्ही. देसाई हॉस्पिटल, मोहम्मदवाडी येथे नेण्यात आले. या उपक्रमाचा लाभ कात्रज, कोंढवा, बिबवेवाडी, पद्मावती, वारजे, धायरी, वडगाव शेरी, भोसरी, येरवडा, लोहगाव, हडपसर तसेच शिवापूर-वेल्हे परिसरातील नागरिकांना मिळाला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, वृद्ध आणि उपचारापासून वंचित राहिलेल्या रुग्णांसाठी हा उपक्रम अत्यंत दिलासादायक ठरला. या वेळी माय माऊली केअर सेंटरचे संस्थापक अध्यक्ष श्री. विठ्ठलराव वरुडे पाटील, तसेच विशाल वरुडे पाटील, अश्विनी वरुडे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

त्यांनी रुग्णांना धीर देत समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला. “वृद्ध व अंथरुणाला खिळलेल्या आजी-आजोबांची सेवा करणे हेच आमचे खरे कार्य असून समाजसेवाच आमची खरी ओळख आहे,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. या उपक्रमामुळे अनेक रुग्णांच्या आयुष्यात नवी आशा निर्माण झाली असून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संस्थांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. भविष्यातही असेच आरोग्यविषयक व समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्याचा मानस माय माऊली केअर सेंटरच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें