आकुर्डी येथील शितळादेवी मंदिर परिसरात भूमिपूजनाचा विधी भक्तिभावाने पार पडला. हा सोहळा भूमातेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या प्राचीन परंपरेचा भाग असल्याचे मंदिर समितीने स्पष्ट केले.
या विधीमध्ये जमिनीची विधिवत पूजा करण्यात आली. तसेच भूमातेप्रति आदर व्यक्त करण्यासाठी गोड नैवेद्य अर्पण करण्यात आला. धार्मिक विधी, मंत्रोच्चार आणि भक्तिमय वातावरणात हा सोहळा झाला.
यावेळी मारवाडी समाजातील भगिनींनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत पूजा केली. या विधीमागील श्रद्धेनुसार भूमीला आईचे स्थान देत तिच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. शेती, वास्तू आणि इतर मंगल कार्यांपूर्वी भूमीपूजन करण्याची प्राचीन परंपरा आहे. या विधीमुळे मंदिर परिसरात भक्तिमय आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.












