घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

डंपरनं सायकलस्वार विद्यार्थ्याला चिरडलं, जागीच मृत्यू

पिंपरी चिंचवड शहरातील प्रेम लोक पार्क परिसरात आकुर्डीवरून चिंचवडगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरती एका 14 वर्षाच्या शाळकरी मुलाला आरएमसी ट्रक अर्थात डंपरने चिरडलं.

या घटनेत शाळकरी मुलाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला असून या अपघातात फारुक शकील तांबोळी या नववीत शिकणाऱ्या शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू (Accident News) झाला आहे, या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ देखील समोर आला असून, घटनेचं गांभीर्य ओळखून पिंपरी चिंचवड पोलिसांनी ट्रक चालक आणि ट्रकला देखील ताब्यात घेतला आहे, सध्या या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

तर या अपघाताबाबत माहिती देताना पोलिस निरीक्षक दत्ता चासकर यांनी सांगितले की, प्रेम लोक पार्क जवळून खंडोबा माळी परिसरात चाफेकर चौकाकडे एक आरएमसी ट्रक अर्थात डंपर चालला होता, त्यावेळी सायकलवरून जाणाऱ्या चौदा ते पंधरा वर्षांचा मुलगा फारुक शकील तांबोळी असं त्याचं नाव आहे. तो सायकलवरती चालला होता. पाठीमागून आरएमसी ट्रकने धडक दिली. मुलाला वायसीएम हॉस्पीटलमध्ये दाखल केलेलं आहे. आरएमसी चालकाला ताब्यात घेतलं आहे. त्याचा ट्रक देखील ताब्यात घेतलं आहे. त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. चालकाला पोलिस स्टेशनला नेण्यात आलं आहे, त्याचा तपास सुरू आहे. साडेबाराच्या आसपास ही घटना घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मुलाचे नाव फारुक शकील तांबोळी असं आहे. तो इयत्ता नववीमध्ये आहे. ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे. योग्य कारवाई सुरू आहे. अशा डंपरला शहरात येण्यासाठी काही काळ ठरवून दिलेला आहे. आपल्याकडे १२ वाजल्यानंतर प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. हा अपघात साडेबारा वाजण्याच्या आसपास घडला आहे, त्यामुळे ते प्रतिबंध वेळेत घडले आहे. आम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करत आहोत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें