घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा परिसरात आग, अग्निशमन दलाची धाव

देशभरातील, जगभरातील पर्यटकांचं आकर्षण असलेल्या पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा परिसरात आग लागल्याने अनेकांची धांदल उडाली.शनिवार वाड्याजवळील देसाई कॉलेज समोर झाडाचा पाला पाचोळा व झाडाच्या फांद्यांना मोठ्या प्रमाणात आग लागली होती.

आगीची माहिती मिळताच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली असून जवानांनी आग पूर्णपणे आटोक्यात आणली आहे.

सुदैवाने आगीत कुठलेही नुकसान झाले नसले तरी आग लागल्याने येथील वाळलेले गवत आणि पालापाचोळा, स्वच्छतेचा मुद्दा समोर आला आहे.

आगीमुळे येथील ऐतिहासिक शनिवार वाड्याच्या एका दरवाजापर्यंत आगीचे लोट पोहोचले होते, मात्र त्यावरही पाणी मारण्यात आलं आहे.अग्निशमन दलाच्या गाडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला.

शनिवार वाडा हे देशातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून भारताच्या कानाकोपऱ्यातून, महाराष्ट्रातून दरवर्षी लाखो पर्यंटक पुण्यात शनिवार वाड्याल भेट देतात.

बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांच्या ऐतिहासिक संदर्भाच्या अनेक खुणा आजही शनिवार वाड्यात इतिहासाची साक्ष देतात.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें