घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

कात्रज-भारती विद्यापीठ परिसरात गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या रांगा

जागतिक स्तरावर वाढलेल्या अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर त्याची झळ आता सर्वसामान्य नागरिकांनाही बसू लागल्याचे चित्र दिसत आहे. घरगुती गॅसच्या टंचाईमुळे पुण्यातील कात्रज आणि भारती विद्यापीठ परिसरात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

परिसरातील विविध गॅस एजन्सीच्या कार्यालयासमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. गॅस सिलिंडर बुकिंगसाठी नागरिक सकाळपासूनच एजन्सीसमोर रांगेत उभे राहत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा प्रकार मागील तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.उन्हाचा तीव्र त्रास सहन करत अनेक ग्राहकांनी झाडांच्या सावलीचा आधार घेत तासन्‌तास प्रतीक्षा केल्याचे दिसून येत आहे. गॅसचा पुरवठा कमी झाल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रशासनाने गॅसचा पुरवठा तातडीने सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.घरगुती गॅसच्या टंचाईमुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून दोन सिलिंडरच्या वितरणामध्ये २५ दिवसांचे अंतर ठेवण्याची अट घालण्यात आल्यामुळेही अनेक कुटुंबांना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे.

प्रतिक्रिया

गॅस तुटवड्यामुळे नागरिकांत चिंतेचे वातावरण असून कामधंदा सोडून रांगेत उभारण्याची वेळ महिलांवर आली आहे. वाढत्या मागणीच्या तुलनेत गॅसचा पुरवठा कमी असल्याने परिस्थिती अधिकच बिकट होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें