घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

महिला पोलिसाच्या घरांतच चोरट्यांनी केली हातसफाई

चोरट्यांनी महिला पोलिसाच्या घरात चोरी करून घरातील ५.८ तोळे सोन्याचे दागिने, रोकड चोरून नेल्याची घटना हवेली तालुक्यातील थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील कांबळे वस्ती परिसरात बुधवार (११ मार्च) रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.

याप्रकरणी पुंडलीक तानाजी थोरात (वय-३८, रा. कांबळे वस्ती, थेऊर रोड, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार थोरात यांच्या पत्नी अश्विनी पवार या लोणी काळभोर पोलिस ठाण्यात महिला पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत.

११ मार्च रोजी सकाळी नेहमीप्रमाणे मुलगी अनुजा (वय १०) ही सकाळी आठ वाजता शाळेत तर पत्नी अश्विनी पवार या ड्युटीवर गेल्या.त्यानंतर पुंडलीक थोरात हे सेकंड शिफ्ट असल्याने दुपारी १.४० वाजण्याच्या सुमारांस नोकरीसाठी घराबाहेर पडले.घर सोडताना त्यांनी मुख्य दरवाजाला कुलूप लावून सर्व खिडक्या बंद केल्या होत्या.

दुपारी साडेतीनच्या सुमारास मुलगी अनुजा शाळेतून परत आली तेव्हा तिला घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळून आले.तिने सदर प्रकार खाली राहणाऱ्या भाडेकरू गौरी खोत यांना सांगितला.त्यांनी तात्काळ पुंडलीक थोरात यांना फोनवरून याबाबत माहिती दिली.

थोरात तातडीने कंपनीतून घरी परतले.घरात प्रवेश करताच लोखंडी कपाटाचे कुलूपही तोडलेले दिसले आणि घरातील कपडे व वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या.कपाटातील लॉकर तपासला असता त्यातील रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

यामध्ये २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, ५ ग्रॅम वजनाचे दोन टॉप्स, १० ग्रॅम वजनाची चैन, ११ ग्रॅम वजनाचे दोन झुमके, १० ग्रॅम वजनाची पुढारी अंगठी, २ ग्रॅम वजनाचे दोन बदाम या सोन्याच्या दागिन्यांसह ६ भार वजनाचे पायातील पैंजण एकुण २ जोड, २ भार वजनाचे जोडवे असे ५ तोळे ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व २५ हजारांची रोख रक्कम असा एकूण चालू बाजार भावाप्रमाणे सुमारे ९ लाखांहून अधिक रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे.

याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें