घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

मद्यपी चालकांची झिंग पोलीस उतरवणार..

पुणे वाहतूक पोलिसांनी जानेवारीपासून आतापर्यंत दोन हजारांपेक्षा अधिक मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करून त्यांचे समुपदेशन केले आहे. मात्र, त्यानंतरही काही चालक पुन्हा मद्यपान करून वाहन चालवताना आढळत आहेत.पोलिसांनी आता अशा चालकांविरुद्ध कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. अशा गुन्ह्यांची पुनरावृत्ती करणाऱ्यांचा वाहन परवाना रद्द करून कारागृहात टाकण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

पुण्यात मागील वर्षी ६ हजार ७०० मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली, त्यापैकी ६७ जण दुसऱ्यांदा मद्यपान करून वाहन चालवताना आढळले, त्यांचा वाहन परवाना रद्द करण्यात आला. काहींना न्यायालयाने कारागृहात पाठवले होते.

यावर्षी झालेल्या कारवायांमध्येही १४ जण दुसऱ्यांदा मद्यपान करून वाहन चालवताना सापडले असून त्यांच्या विरोधातही कडक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.पुणे शहर वाहतूक विभागाने ६ ते ८ मार्च दरम्यान शहरातील विविध भागांमध्ये विशेष मोहीम राबवली.

या काळात शहरात ३० ठिकाणी नाकाबंदी करून ब्रेथ ॲनालायझरच्या साहाय्याने वाहन चालकांची तपासणी करण्यात आली.त्यात १८९ चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या कारवाईत पकडलेल्या चालकांचे ११ मार्चला येरवडा येथील वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त कार्यालयात समुपदेशन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला १३५ मद्यपी वाहनचालक उपस्थित होते. त्यावेळी मद्यपानानंतर वाहन चालविण्याचे गंभीर परिणाम आणि नियमांचे पालन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले होते.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें