घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

धनकवडीत नवनिर्वाचित नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

लायन्स क्लब धनकवडी व संतोष सहकारी सोसायटीच्या संयुक्त विद्यमानाने आयोजन
धनकवडी | प्रतिनिधी :
लायन्स क्लब धनकवडी आणि संतोष सहकारी सोसायटी धनकवडी यांच्या संयुक्त विद्यमानाने नवनिर्वाचित विद्यमान नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली.
या सत्कार सोहळ्याला राजेंद्र आबा शिळीमकर, महेश वाबळे, बाळासाहेब धनकवडे, अरुण राजवडे, गौरव घुले, वर्षाताई तापकीर, शैलजाताई भोसले, विनाताई घोष, सई थोपटे, सीमा बेलदरे, प्रतिभाताई चोरगे, तेजश्री बदक हे नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी आमदार माधुरीताई मिसाळ यांच्या वतीने त्यांचे पीए मंदार रांजेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “संतोष सहकारी सोसायटीची जेवढी शक्य असेल तेवढी विकासकामे आमदार निधीतून करून देण्याचा निश्चित प्रयत्न केला जाईल.”
कार्यक्रमाला संतोष सहकारी सोसायटीचे चेअरमन भानुदास पायगुडे, सीए बाळासाहेब घाडगे, विलासराव बावकर, दीपक माने, अतुल देशमुख, ज्योती वेदपाठक, डॉ. सुचिता भालेराव, वास्तुतज्ज्ञ रमेश पलंगे, सारंग रासने, उदय कुलकर्णी, कविता ढवळे, सुवर्णा घाडगे, उज्वला रासने आदी सभासद व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड. अनुराधा भारती यांनी केले, तर आभारप्रदर्शन रवींद्र सादुल यांनी मानले. सत्कार सोहळ्यामुळे परिसरातील विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें