घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुण्यातील गुंडाने जमिनीच्या वादातून झाडल्या गोळ्या?

केडगाव स्टेशन परिसरात शनिवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक गृहनिर्माण संस्थेच्या शेजारी ही धक्कादायक घटना घडली असून जमिनीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.या घटनेमुळे केडगाव स्टेशन परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीने जमिनीच्या वादातून हा गोळीबार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पहाटेच्या शांत वातावरणात अचानक गोळीबाराचे आवाज ऐकू आल्याने परिसरातील नागरिक घाबरून बाहेर पडले. लोकवस्तीच्या मध्यभागी ही घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून प्राथमिक तपास सुरू केला असून संबंधित व्यक्तींची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया यवत पोलीस स्टेशनमध्ये सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, लोकवस्तीमध्ये झालेल्या या गोळीबारामुळे नागरिकांनी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें